STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

तिची वाट पाहिली

तिची वाट पाहिली

1 min
158

काल तिची खूप वाट पाहिली 

पण ती काही आली नाही 

माझ्या जख्मी हृदयासाठी 

मलम काही झाली नाही || 0 ||

 

खूप आशा होती मला 

माझ्यासाठी येईल ती 

मला समजून घेण्याची 

थोडी तसदी घेईल ती 

वाटतं माझ्या हृदयासाठी 

आता कोणी वाली नाही 

माझ्या जख्मी हृदयासाठी 

मलम काही झाली नाही || 1 ||

 

माहित होतं तिला मी 

वाट तिची बघत आहे 

तिच्यासाठी वेडा होऊन 

तिच्यासाठी जगत आहे 

माझ्यासाठी घरातून 

बाहेर ती निघाली नाही 

माझ्या जख्मी हृदयासाठी 

मलम काही झाली नाही || 2 ||

 

 

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance