STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

थोडी सुखावलीय निर्भया

थोडी सुखावलीय निर्भया

1 min
345

थोडी सुखावलीय निर्भया

विश्वास करू पाहतेय

न्यायव्यवस्थेविषयी थोडी

जागृकता तिला दिसतेय

    मरतांना तरी जाणीव 

    झाली असेल तिच्या वेदनेची

    वासनांध, क्रूर, विक्रूत

   गिधाडांना मरणयातनेची

किती बहरली असती

निर्भया आयुष्याच्या वाटेवर

पण घायाळ झाली भाबडी

चालतांना काट्यांवर

    असंख्य जख्मा अंगावर

    प्रत्येक मनावरही उमटल्या

    सोसवेना वेदना मग तीने

    कायमच्या पापण्या मिटल्या

सुखावलीय आज थोडी

गुन्हेगारांना झाली शिक्षा

शांत झाला धगधगता जीव

म्हणे असंख्य निर्भयांची करा रक्षा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy