थकले मन माझे जरी
थकले मन माझे जरी
पुन्हा नव्या जोमाने
त्यास उभारील मी...
मी न एकटी जगात
दुःखी-कष्टी त्यास
ठणकावून सांगेल मी...
आली कित्येक संकटे
त्यांना पुरून उरेल मी...
नाही श्रीमंती कामाची
माणूस आणि माणुसकी
नेहमीच जपेल मी...
झाला अविचारांचा त्रागा
तर आई-वडिलांचे
संस्कार आठवेल मी...
थकले मन जरी माझे
पुन्हा नव्या जोमाने
त्यास उभारील मी...