थांबवा निसर्ग ऱ्हास
थांबवा निसर्ग ऱ्हास
भौतिक या सुखाची
माणसाशी मोठी हाव
लोभापायीच तो करी
निसर्गावरती घाव
वर्तमान सुखास्तव
करी निसर्गाचा ऱ्हास
आंधळा होऊनी टाकी
स्वगळी स्वतःच फास
तुझ्या वागण्याने होई
नैसर्गिक असंतुलन
अवर्षण महापूर
सुनामी व भूस्खलन
विनाशाची ही नांदी
थांबवा निसर्ग ऱ्हास
काय कामाचे वैभव
मुकसील जीवनास
जपा पर्यावरणास
अनमोल हाची ठेवा
करण्या ते संवर्धन
एकतरी झाड लावा
