STORYMIRROR

Kishorkumar Bansod

Inspirational

3  

Kishorkumar Bansod

Inspirational

मी एक शिक्षक

मी एक शिक्षक

1 min
1.6K

अंधारल्या वाटा...

मार्ग दावीतो प्रकाशाचा

स्वंय दीप भव...

मार्ग हा उत्थानाचा


मी एक शिक्षक आहे

शाळा हे माझे मंदिर आहे

विद्यार्थी हे माझे दैवत आहे

ज्ञानदान हा माझे धर्म आहे


मार्गदर्शन तव करता

विसरतो हे देहभान

संचित न ठेवी स्वतः काही

शमे न विद्यादानाची तहान


अध्यनार्थी ज्ञान संपादिता

मिळे आत्मिक समाधान

कौशल्याने करी अध्यापन

’गुरुजी’ म्हणून समाजी मान


आज शिक्षक दिनी

गुरुचे करूया स्मरण

धन्यवाद शिक्षकांनो

तुम्हामुळे घडले हे जीवन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational