STORYMIRROR

Kishorkumar Bansod

Inspirational

3  

Kishorkumar Bansod

Inspirational

खरे स्वातंत्र्य

खरे स्वातंत्र्य

1 min
141

वचीतांच्या पायाभूत सुविधांची

होईल जेव्हा पूर्तता .....

तीच असेल सर्वसामान्यांंची

खरी स्वतंत्र्यता .....


विटा , मातीचा भार

न पडवा बालकाच्या शीरी

शिकावा प्रत्येक बालक

हि सर्वांचीच जवाबदारी


एकमेकावर दोषारोपण

करून चालनार नाही

आयाबहीनीच्या सुरक्षिततेची

आता द्यावी लागेेल ग्वाही


स्त्रीला ही स्वरक्षणार्थ

आता सिद्ध व्हावेे लागेल

वासनांध नराधमाची

नांगी ठेचाविच लागेल


वारसाच्या हव्यासापोटी उमलण्या

आधी कळ्या कुस्करल्या जातात

स्तोम माजवून अंधश्रधेचे भाबडयांच्या

ताळूवरचेे लोणी संधीसाधू खातात


सगळ्यांंना सोबत घेऊन

साधावा लागेल विकास

रोजगार निर्मिती होता गावात

कशी पडतील खेडी भकास


शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचेल

जेव्हा प्रत्येकाच्या दारोदारी

घडता चारीत्र्य संंपन्न नागरीक

सुखसमृद्धी नांदेल या भूवरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational