STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

4  

Manisha Awekar

Classics

तेजोमय सांजवात

तेजोमय सांजवात

1 min
392

दिवेलागणी होताच

सांजवात देवापुढे

प्रकाशाने ज्योतीच्या

तेज पसरे चहूकडे   (1)


मंद प्रकाशात देव्हारा

लखलखीत उजळे

हळदीकुंकू वाहूनीकरी

गृहलक्ष्मी ओवाळे   (2)


शुभंकरोती म्हणूनी

विनवे देवदेवतांना

सर्वांना निरोगी ठेव

करी मनोभावे प्रार्थना  (3)


सांजवात लागताच

मंगल पवित्र श्लोक

रामरक्षा भीमरुपी

संस्कार पूर्वजांचे थोर  (4)


देवापाशी दिवा पाहूनी

लक्ष्मी प्रवेश करी

समाधानी गृहलक्ष्मी

आनंदाच्या सरीवर सरी (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics