तेचं प्रेम असावे
तेचं प्रेम असावे
हे प्रेम म्हणजे कायं,
हे मला ही नाही माहितं,
पण कागदावर लेखणीने शब्दं उतरवण्याआधी,
हृदयातून कवितेसाठी जी एक आर्त हाक ऐकू येते,
कदाचित तेचं प्रेम असावे
मुलाला जन्म देण्याआधी असह्य कळा सोसूनही,
आईच्या चेहर्यावर हास्य दिसावे,
कदाचित तेचं प्रेम असावे
नभात असंख्य तारका सोबती असताना ही,
चंद्राने चांदणीसाठी झुरावे,
कदाचित तेचं प्रेम असावे
प्रेम म्हणजे कायं हे नेमके मला ही नाही सांगता येणार,
हो पण प्रेम ना त्या पक्षांप्रमाणे असावे,
अगदी स्वच्छंदी आणि मुक्त असे मला वाटते,
कारण कुठल्या चौकटीत बंदिस्त होऊन प्रेम नाही राहू शकतं
प्रेम ना त्या सागराच्या लाटांप्रमाणे चं असते अगदी निर्भड,
किनार्याला कोणाचीही पर्वा न करता भिडणारे,
रेतीला हळुवार स्पर्श करणारे.
हो,
प्रेम असेच असेल कदाचित

