STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

ते क्षण

ते क्षण

1 min
142

खूप आहेत आठवणी,तुझ्या माझ्या

तू विसरला असशीलच,

मी मात्र आज ही जपून ठेवलेल्या

तू गुंतला होतास माझ्यात

अन मी ही गुंतले होते तुझ्यात

जपून ठेवले आहे त्या क्षणांना ,

आज ही हृदयाच्या एका कप्प्यात

तू दिलेले गुलाबाचे फुल,

तू दिलेली डायरी अन पेन

छान लिहितेस,कायम लिहीत जा

असच म्हणाला होतास ना?

सगळं आहे रे माझ्या जवळ,

ते पेन तुझी डायरी..

पण शब्दच हरवून गेले,सोबत तुझ्या

जपून ठेवले सगळे क्षण

पण नाही जपता आले प्रेमाला तुझ्या


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance