STORYMIRROR

उत्तम गांवकर

Romance

3  

उत्तम गांवकर

Romance

तारूण्य

तारूण्य

1 min
168

रंग केशरी खुलतो

तव सुंदर कायेवरती

तारूण्य रसरसलेले

प्रेमास आली ग भरती

दिवस होळीचा आला

मी गुलाल दिधला उधळून 

चेहर्यावर लटका राग

खुश झालीस खुप मनातून 

संवाद साधने तुझशि

खुप कठीण वाटत होते. 

दूरून पाहूनी तुजला

हे शरीर आटत होते

भिती निघुनि गेली आज

भेट घेऊ या रोज

करून ये सुंदर साज

मन एकरूप ग झाले

मग आता कशाला लाज



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance