तारुण्य वार्धक्य
तारुण्य वार्धक्य
तारूण्याची गाणी
माहीत पावसाला
डोळा आले पाणी
अलगद म्हातार्याला
ज्वानीचा तो कहर
प्रीतीचा तो बहर
घे ना पिऊन राजा
वार्धक्यातील जहर
थरथरत्या ओठांना
चुंबून घेई राणी
याद करी म्हातारा
पहिली प्रेम कहाणी
चिंब पावसाने गं
भिजले राणी राजा
हळूच पावसात गं
पडला आजी आजा
अलगद मिठीत तिच्या
फिकीर नसे जगाची
कालची ती कहाणी
वाटे आज युगांची
