तारका
तारका
1 min
256
निशा नभी
अंथरल्या
या तारका
चमकल्या
भोवताली
चंद्र आभा
पहूडल्या
काळ्या नभा
फुले जणू
रातराणी
सजे निशा
नक्षत्रांणी
हा निशेचा
चंद्र हार
चांदण्या ह्या
नक्षीदार
धरा मुग्ध
तारकात
प्रेम वेडी
ही नभात