STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Fantasy Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Fantasy Others

ताईची आठवण

ताईची आठवण

1 min
319

येते आठवण मला

माझ्या विजया ताईची |

छान हसरा चेहरा

गोड त्या नवलाईची ||१||


येते मला आठवण

ताई तुझी वारंवार |

जेंव्हा गेलीस सोडून

झालो होतो थंडगार ||२||


येते मला आठवण

भांडू लहानपणात |

पण गट्टी आमच्यात

होई काहीच क्षणात ||३||


येते मला आठवण

तुझे प्रेमळ बोलने |

नसे आवडत तुला

माझे नकली डोलने ||४||


येते मला आठवण

देत होतो त्रास तुला |

तरी प्रेमाने वागून 

सांभाळत होती मला ||५||


येते आठवण मला

दिली नेहमीच साथ |

सुख दुःखात नेहमी

राही डोक्यावर हाथ ||६||


येते आठवण मला

भाऊबीज आनंदाचा |

अनुबंध  भावनिक

धागा रेशीम बंधाचा ||७||


येते आठवण मला

तुझा मृत्यूचा प्रसंग |

येतो  दाटून हृदय

शांती माझी होई भंग ||८||


येते आठवण जेव्हा

होते कासावीस मन |

मनी मनात रडतो

भाऊ तुझा गोवर्धन ||९||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy