सवय
सवय
सवय म्हणे तुझं माझं मिलन कधी होणार नाही
तू माझ्या जीवनात कधी येणार नाही
म्हणे रडत बसशील तारे मोजत राहशील
मन तुटेल तुझ तुला माझी लय सापडणार नाही
माझ्यावर इतकं प्रेम करू नको
मला तुझी सवय लागणार नाही
तिला माझ्या प्रेमाची गोष्ट वाटते नुकसान
आठवणीत तिच्या मन माझं झालं स्मशान
तुला मिळेल रे सजा उगीच वाजवू नको बाजा
मी तुला प्रेमात शह देणार नाही
तू दिसायला आहेस खूप साधा भोळा
मला लागला आहे आई बाबांचा लळा
तू प्रेमात नाचवशील
तुला प्रेमाची गय येणार नाही
बस झालं संगम तू सोड रे आता माझा विचार
शायरी लिहत रहा पाईपलाईनला बनवू नको लाचार
मीच निघून जाते लपून बसते
दुसरी कुठली मुलगी तुला नाय बोलणार नाही

