स्वप्नपाखरू
स्वप्नपाखरू
स्वप्नपाखरू
भिरभिरले वळणावर सोनेरी फुलपाखरू
मनात विसावले तुझ्या आठवाचे स्वप्नपाखरू
क्षणभंगुर लाघवी मोहक त्या मखमली शाखा
मनमंदिरी ऊजळती तुझ्याच लोभस कथा
मनोहारी पारवांचा याराना तो स्वैर
तुझी चाहुल लागता होते मन सैरभैर
गगनात तारकांचा नयनरम्य पाहुनी खेळ
अजुनही स्मरते तुझ्यासवे ती धुंद कातरवेळ

