STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

स्वप्नभंग

स्वप्नभंग

1 min
426

स्वप्न विणतो नवे झोपतांना

स्वप्न माझे जुने भंगतांना


आज संसार का फाटला हा

ओठ माझे तुझे भेटतांना


वाजले ढोल ताशे नगारे

साजणी हात तू सोडतांना


नाव माझी कुठे सापडेना

वादळाशी सदा झुंजतांना


वाटतो दूर नाही किनारा

थांबला श्वास का पोहतांना


पेटली चूल पोटात आता

चूल विझली घरी पेटतांना


का सजा रोजची फुलांना

कंटकांना सुखी ठेवतांना


रक्त माझे किती सांडलेले

भूतकाळा तुला भांडतांना


भावना गोठल्या का दुपारी

मी उन्हाच्या झळा सोसतांना


जाळले पोळले जीवनाने

शांतता लाभली संपतांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy