STORYMIRROR

Ashok Kulkarni

Fantasy

3  

Ashok Kulkarni

Fantasy

स्वप्नात पाहिले मी

स्वप्नात पाहिले मी

1 min
473

स्वप्नात पाहिले मी

  होतो तुझ्या कुशीत

    रात्र जागवत होती

     होतो मी खुशीत।।


निळ्याशार समुद्राच्या लाटा

   गात होती खळखळणारे गीत

      मंद चमकती चांदण्या

        चंद्रावरी करिती प्रीत।।


विळखा होता गळ्याभोवती

    कोमल तुझ्या हातांचा

     आवडे गंध मनाला

       तुझ्या श्वासाचा।।


जरी सरत होती रात्र

   खिडकीतून वारा वाहे मंद 

    घेतले होते तुला मिठीत

        झालो मी पुरता धुंद।।


स्वप्नातुनी जागा होई

  तरंगत होते मनात स्वप्न

    वाटे असेच पडून रहावे

      पुन्हा पहाण्या ते गोड स्वप्न।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy