STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

... स्वप्नांच्या दुनियेत...

... स्वप्नांच्या दुनियेत...

1 min
473

स्वप्नांच्या दुनियेत

उडत होते आकाशात

श्वेत चांदण्यांचा पलंग

झूलत होता आभाळात...


लागली स्वप्नात चाहूल त्याची 

शोधत होते ज्याला मी 

स्वप्नातील राजकुमार तो 

स्वप्नातच पाहिला मी... 


शुभ्र पांढऱ्या घोड्यावर

आली त्याच्यासवे स्वैर भटकून 

स्वप्नातील राजकुमाराला 

घेतले नजरेत साठवून... 


स्वप्नांच्या या राज्यात 

कल्पनातीत असते मन 

जगतो विलासित दुनियेत 

 बरोबर असतात प्रेमरंगी स्वप्न... 


स्वप्न नयनी पाहिलेले 

सत्यात उतरेल का 

स्वप्नातील राजकुमार तो 

 उद्या पून्हा स्वप्नात येईल का... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational