स्वप्न
स्वप्न


१) आरशातील प्रतिबिंब
खूप गोड गाली हसते
माझीच छबी ती छान
स्वप्नात रंगून जाते....
२) स्वप्न पाहिले जागेपणी
कोण माझा राजकुमार?
निद्रावस्थेतत येऊन गेला
केले माझे स्वप्न साकार....
r>
३) स्वप्नांना पंख लावले
अमेरिकेच्या हिरवाईचे
विस्तीर्ण स्वरूप पाहिले
मॅकिनो आयलंडचे....
४) भरारी घेतली आकाशात
स्वप्नांच्या मेघात रमले
सजणासह साजणी
इंद्रधनूच्या झुल्यावर झुलते....