स्वप्न पहाता चहूकडे"
स्वप्न पहाता चहूकडे"
स्वप्न पहाता चहूकडे
ती माझी नयने जेंव्हा
तुजलाच सख्या शोधत होती
नाही दिसला तेंव्हा।।
नव्हता कधी सोबत माझ्या
भासच होई अंती
विचार करता माझी मजला
लाजच येई भलती।।
नव्या स्वप्नात उगाच पडले
तुझ्या प्रेमात तीथे
वाटे मजशी मनात माझ्या
जागत असते ईथे।।
समोर ये तू स्वप्नातूनी
सखी पुरे हा गून्हा
करणार किती कर बहाणे
येवू नकोस पून्हा।।
नाही तर ही बंद करावे
स्वप्ना मधले गाणे
रोजचेच हे सतावने अन
प्राय: तुझे येणे जाणे ।।
स्वप्नातसुद्धा नाही माझी
अशी वागशिल राणी
माझा मी ना राहिलो अता
तुझा झालोय सजणी।।