STORYMIRROR

Sanjana Kamat

Tragedy Action

3  

Sanjana Kamat

Tragedy Action

स्वैराचार

स्वैराचार

1 min
257

स्वैराचाराचे राक्षस मोकाट सुटलेत,

जळी स्थळी दडीमारून बसलेत.

माणसाचे रुप घेऊन नटलेत,

हिस्त्र प्राण्यांचे काळीज घेऊन दडलेत.


पाहून स्वैराचारांचे राज्य,

आठवते क्रांतिवीरांनचे साम्राज्य.

खेळली देशासाठी स्वतःच्या रक्ताची होळी.

एकविसाव्या शतकात ही स्वैराचारांची पोळी.


इंग्रजांनी केले भारतावर राज्य,

करून अन्याय व अत्याचार.

आतड्याला पडतो पीळ आजकालचा,

पाहून स्वैराचार आणि भष्ष्ट्राचाऱ.


जणू ढगफुटीतून प्रत्येक क्रांतिकाऱ्यांचे,

डोळ्यातील ढळढळा आंसू वाहतात.

त्यांच्या बलिदानाला विसरून स्वैराचाराने,

देशाला फसविणाऱ्यांचे थैमान पाहून रडतात.


परप्रांतीयांनचा लोढा, पळवणूक स्वकीयांची,

आणा प्रणाली प्रगत देशातील कडक शासनाची,

सोय ती राज्या राज्यात नोकरी, हॅास्पिटलची,

स्वैराचारांस तिथल्या तिथेच ठेचण्याची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy