स्वार्थ वाईट फार
स्वार्थ वाईट फार
सारी नाती खोटी ही,खोटाच संसार
स्वर्थाभोवती फिरते दुनिया,स्वार्थ वाईट फार...
आई,बाप,बहिण,भाऊ,कोणी कुणाच नाहु
आपलं आपण पहाती सारे,दुनिया वाईट ही
काय कुणाचा भरोसा,काय कुणाचं खरं...
जो तो बदलतोय रंग,रंग वेगळे प्रत्यकाचे
दात वेघळे प्रत्येकाचे,खायायचे,दाखवायचे
जो तो करतोय घात,प्रत्येकजन चोर....
कसा ठेवावा भरोसा कसा माणूस ओळखावा
ढंगी,नाटकी सारेच,ज्याचा,त्याचा आहे कावा
येणे जाणे एकटेच,नको खांदेकरी चार...
जगु देईना,मरु देईना कोणी कुणाला सुखानं
मागे एक,पुढे एक,तोंडावर गाती गुण
नको कुणाचं ओझं,नको कुणाचे उपकार...
ज्याचं त्याला सुखदुःख,आहे कुणाचं कोण
नको आधीमधी कुणाच्या,नको ते देणंघेणं
चुक ती आपलीच,नको होऊ रे बेजार...
ताकापुरती आजीबाई,कामापुरता मामा
गरज सरो,वैद्य मरो असा हा जमाना
नाही इथं कोणी वेडया,तुझयासाठी रडणार...
कसं वागावं कुणाशी काही कळणार नाही
कर कितीही कोशिस सुत जुळणार नाही
भल्याबुऱ्याचा तुझ्या कर तूच विचार...
कुणाच्या लागु नको नादी,ध्यानी हे धर
ठेऊ नको आता भरोसा तू कुणावर
हेच आहे गडया ह्या जीवनाचं सार...