STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

स्वार्थ वाईट फार

स्वार्थ वाईट फार

1 min
189

सारी नाती खोटी ही,खोटाच संसार

स्वर्थाभोवती फिरते दुनया,स्वार्थ वाईट फार...

आई,बाप,बहिण,भाऊ,कोणी कुणाच नाहु

आपलं आपण पहाती सारे,दुनया वाईट ही

काय कुणाचा भरोसा,काय कुणाचं खरं...


जो तो बदलतोय रंग,रंग वेगळे प्रत्यकाचे

दात वेघळे प्रत्येकाचे,खायायचे,दाखवायचे

जो तो करतोय घात,प्रत्येकजन चोर....


कसा ठेवावा भरोसा कसा माणुस ओळखावा

ढंगी,नाटकी सारेच,ज्याचा,त्याचा आहे कावा

येणे जाणे एकटेच,नको खांदेकरी चार...


जगु देईना,मरु देईना कोणी कुणाला सुखानं

मागे एक,पुढे एक,तोंडावर गाती गुण

नको कुणाचं ओझं,नको कुणाचे उपकार...


ज्याचं त्याला सुखदुःख,आहे कुणाचं कोण

नको आधीमधी कुणाच्या,नको ते देणंघेणं

चुक ती आपलीच,नको होऊ रे बेजार...


ताकापुरती आजीबाई,कामापुरता मामा

गरज सरो,वैद्य मरो असा हा जमाना

नाही इथं कोणी वेडया,तुझयासाठी रडणार...


कसं वागावं कुणाशी काही कळणार नाही

कर कितीही कोशिस सुत जुळणार नाही

भल्याबुऱ्याचा तूझ्या कर तुच विचार...


कुणाच्या लागु नको नादी,ध्यानी हे धर

ठेवू नको आता भरोसा तू कुणावर

हेच आहे गडया हया जीवनाचं सार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational