STORYMIRROR

Chaitali Ganu

Romance

4  

Chaitali Ganu

Romance

सूर्य चंद्र प्रेमी

सूर्य चंद्र प्रेमी

1 min
778

एक संध्याकाळ

एका समुद्राची

मध्ये तो

मागे सूर्य

आणि समोर चंद्र

तो प्रेमी

त्या दोघांचा

मग लाटा आणि किनाऱ्यांचा कोण?

त्याला सहज विचारलं एकदा

जास्त कोण आवडतं

चंद्र, सूर्य की तुझ्यातला प्रेमी

लाटांची स्पष्ट नाराजी ऐकू आली

किनाऱ्याचं रेताडपण जास्त दिसलं

पण समुद्र मात्र शांत होता

आतमध्ये वडवानल असूनही

त्याच्या मागे सूर्य आणि समोर

चंद्र होता

आणि तो तसाच त्यांचा प्रेमी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance