STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance

4  

Rama Khatavkar

Romance

पापणीच्या काठावर

पापणीच्या काठावर

1 min
259

पापणीच्या काठावर

नीज केव्हाची अडून

आत यावया लाजते

कोणी बसले लपून.  


पापणीच्या काठावर

रेषा काजळ रेखिली

छबी सख्या साजणाची

ऐन्यामध्ये निरखिली.   


पापणीच्या काठावर

थवा उतरे स्वप्नांचा

चारा कोवळया आशेचा,

चुरा चांदणं मोत्यांचा.  


पापणीच्या काठावर

रोजचीच ये-जा झाली,

रानामध्ये आठवांच्या

चिंब पहाट भिजली.   


पापणीच्या काठावर

आज अशा सांजवेळी

मन कातर कातर,

भास करतात खेळी.   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance