STORYMIRROR

Pandit Warade

Romance

4  

Pandit Warade

Romance

गंधवेडा श्याम झालो

गंधवेडा श्याम झालो

1 min
226

पावसाळी रात राणी

दे उशाला हात राणी


रोज आसू गाळतो अन् 

पोळतो विरहात राणी


संशयाचे भूत शिरले

जीवनाचा घात राणी


एकदाची भेट व्हावी

आपल्या शेतात राणी


गंधवेडा श्याम झालो

मी तुझ्या प्रेमात राणी


जीवनाची सांज झाली

त्राण ना अंगात राणी


काळजी माझी नसावी

खूप आनंदात राणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance