STORYMIRROR

Milind Sao

Romance

4  

Milind Sao

Romance

प्रेम आंधळं असतं

प्रेम आंधळं असतं

1 min
229

गतकाळातील आठवण ,

पुसट होणे शक्य नाही ....

पण , स्वप्न आणि सत्यही

एक होणे शक्य नाही.....


समांतर वाटेने चालणारे ,

पुढे जाऊन भेटतील का ....

अवचित छेदून जाता कुणी ,

वाट बदललेली चालेल का ...


कल्पनेच्या गावातील ,

अनुभवलेल्या आठवणी ...

जणू शुष्क पाने ओढलेली ,

तुळस माझ्या अंगणी ...


नभी मंद मंद तारका ,

अन् मावळतीचा अंधार ....

अजूनही त्या झुडूपामागे ,

तुझा टोकाचाच नकार ....


कळते , छळते , त्रास देते ,

तरीही होत नाही विस्मरण ....

नसा नसातुन सळसळते ,

अजूनही तुझी आठवण ....


प्रेम आंधळं असतं ,

सावरताना तुलाच कळलं ...

मी मात्र हेच म्हणेन ,

थोडं माझं , थोडं तुझं चुकलं .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance