आळ...
आळ...
मनात दाटून येतं जेंव्हा
तुझ्या प्रेमाचं आभाळ.
लेखणीतून उतरता शब्द
खबर रानोमाळ...
तुझ्याच आठवणीत
उजाडते सकाळ.
तुझ्या विचारात
अस्वस्थ ही संध्याकाळ.
गुपित तुझं माझं
तुझ्यामाझ्यातच राहील चिरकाळ.
अतूट राहील जोडलेली
एकमेकांशी ही नाळ.
विणल्या जाते अशीच ही
तुझ्यावरच्या कवितांची माळ.
तळमळतं मन भेटीसाठी
आणि अश्रूंचा मात्र डोळ्यांवरती आळ....

