कळी मनाची खुलता
कळी मनाची खुलता
कळी मनाची खुलता
उमलते ही पाकळी
दरवळ पसरता
जाई लाजुनीच कळी
उधळता प्रेममोती
वेचू मिलनाचे कण
होऊ दोघे एकरूप
आठवत प्रेमी क्षण
खेळ चांदण्यांचा नभी
बघ रंगला आकाशी
सख्या तुझ्या भेटीसाठी
राहिलेय मी उपाशी
गंधाळल्या प्रेमलता
व्हावी तुझी गाठभेट
जपतेय मनातूनी
वाटे यावास तू थेट
प्रीत तुझी माझी सख्या
रंगलीय जन्मभरी
सुगंधित रेशमांची
सय राहीलच उरी

