*गुलाबी उषा.....*नजरेन निसर्
*गुलाबी उषा.....*नजरेन निसर्
नजरेन निसर्ग न्याहळणार
पानांची जाळी विणणार
गुलाबी या उषासंगे मग
हिवाळ्याचा आनंद घेणार.....
सजणाच्या साथीनं छान
पहाटेच फिरायला जाणार
गुलाबी या उषामधे बेधूंद
हातात हात घालूनी मजा मारणार...
पहाटेच्या धुक्यात हरवणार
गुलाबी उषेच्या स्वाधीन होणार
वसुंधरावरील सृष्टी उपभोगणार
मयूर बनून धुंदीत विहरणार....
सजणाची साथ आहे मला
उंच उंच गगनी झेपावणार
इंद्रधनूच्या झोपाळ्यावर
मस्त झुला घेत स्वप्ने रंगवणार.....

