आकाश.
आकाश.
भाव मनीचे
आकाशी ते कोरले
बरसले ते
मेघ दाटले
नभी त्या कव्याचे
मन झुरले
नभीचा चंद्र
तुझ्या अंगणी गिरवी
उसंत नसे
आकाशी तुझ्या
चंद्र माझ्या नभीचा
गुंतला असा
चंद्र साथीने
तारका या आकाशी
पाही हर्षाने
मनी वसते
प्रिती सख्याची खुळी
गाली हसते

