STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy Drama Fantasy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy Drama Fantasy

सुपर पाॅवर

सुपर पाॅवर

1 min
153


घेता घेता सकाळी

थंड पाण्याचा शाॅवर

अंगात आली माझ्या

अचानक सुपर पाॅवर


एका बोटानेच उचलली

पाण्याने भरलेली घागर

घटाघटा प्यायचा ठरवला

खारट असा अरबी सागर


डाव्या हाताने ओढू लागलो

शेतामध्ये भलामोठा नांगर

आता उचलूया म्हणालो

मारुतराया सारखा डोंगर


करंगळीवरच उचलला

पॅरीसचा आयफेल टाॅवर

करा मलाच आता प्रेसीडेंट

जसा होता आयसेन हाॅवर


कसला आलाय शाॅवर

आणि कसली सुपरपाॅवर

उठवले आईने झोपेतून

ओतून पाणी बादलीभर


मेल्या ऊठ रे आतातरी

बंद कर जागरण रात्रभर

पुरे झाले सायन्सचे प्रयोग

घाल स्वतःला स्वतःआवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy