STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Tragedy

4  

अरविंद कुलकर्णी

Tragedy

सुकलेले पान

सुकलेले पान

1 min
692

शाळेमधल्या पुस्तकात मिळाले

सुकलेले पिंपळपान

आठवणींनी घातला पिंगा

धरला फेर छान ....


जाळीदार या पानावरुनी

किती ओघळल्या गोष्टी

सवंगड्यांच्या आठवणींनी

जीव होतो कष्टी.....


मंतरलेले होते दिवस

सुगंध गात्रोगात्री

सवंगड्यांच्या मेळ्यामधे

जागून काढल्या रात्री.....


आठवणीत रमून गेलो

झालो मी बेभान

जेंव्हा पाहिले पुस्तकातले

सुकलेले पिंपळपान.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy