सुखी संसार
सुखी संसार
काव्यप्रकार अष्टाक्षरी
अरे संसार संसार
दोन जीव एकजीव
अद्वैतात मीलनाचे
सुख होई जीवशिव (1)
सुख लागे जवापाडे
नवी नवलाई सरे
झळ संसाराची लागे
त्यागातही मोद कळे (2)
तडजोड करण्यात
संसाराचे असे यश
सुख-दुःख एकजीव
साथ देई मनोमन (3)
सारे कुटुंब सुखात
ठेवी कुशल गृहिणी
यशस्विनी तीच होय
कधी नाही उणी दुणी (4)
गोड फुले उमलती
संसाराच्या वेलीवरी
हलकेच उमलवी
मंद वारा जलावरी (5)
माया प्रेम शिंपूनीया
फुले संसार प्रेमाचा
आनंदाचे सारे क्षण
होई संसार सौख्याचा (6)

