सुखाच्या सरी या (सहाक्षरी)
सुखाच्या सरी या (सहाक्षरी)
पडतो पाऊस
रिमझिम सरी
छत्रीत आपण
चल जावू घरी
लगबग तुझी
सावरते साडी
धांदल ती माझी
थांबवतो गाडी
छत्रीचा निवारा
डोईवर असा
तुझ्यासाठी जीव
खालीवर कसा
पिवळ्या पांढऱ्या
गर्दीच गाडयांची
डांबरी रस्त्यात
एकी सावल्यांची
सुखाच्या सरी या
झोंबतो गारवा
मनात काहुर
घालतो पारवा

