STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

4  

Jayshri Dani

Classics

सुखाचा सदरा

सुखाचा सदरा

1 min
328

गढूळ मनाचा ! विसरून वाद !!

साधावा संवाद ! संध्याकाळी !!


अडकला वारा ! मेघवलयात !!

प्रार्थना रूपात ! गुंतावळी !!


गपगार झाडे ! पाखरांची गाणी !!

शिणलेली वाणी ! निजू पाहे !!


तुळशीजवळ ! लावतसे दिवा !!

उडालेला रावा ! मध्यान्हीचा !!


आळवावा राग ! देवळाच्या पारी !!

एकटे अंधारी ! परतणे !!


सुखाचा सदरा ! लाभला कुणाला !!

मोहर मनाला ! गंधाविना !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics