सुगंध चाफ्याचा
सुगंध चाफ्याचा
सुगंधी चाफ्याचा होऊन वर्षाव,
तु अंगणी माझ्या बरसावं
मखमली गोऱ्या हाताने,
मी अलगद तुला स्पर्शावं
घेऊन तु मिठीत मजला,
सारी रात्र चांदण्यात तु जागावं
होऊनी सुगंधी चाफा,
दारी तुझ्या बहरावं
सावलीत तु येता,
मी समाधानाने हसावं
दुःखी होता तु कधी
तुझे अश्रूं ओठाने मी टीपावं
मी गंध तुझा होईन,
तु सुगंधी चाफा माझा व्हावं
मी मनमोहिनी तुझी होईल,
तु माझा मोगरा गजरा व्हावं
मी सावली तुझी होईल,
तु एकरूप माझ्यात व्हावं
मी अर्धांगिनी तुझी होईल,
तु पती परमेश्वर माझा व्हावा
कोणाची ही दृष्ट न लागो,
असा संसार आपला फुलांवा
येतील किती ही संकटे,
होतील किती गैरसमज,
विश्वासानं आपलं नातं दोघांनी बांधून ठेवावं
तिखट, गोड भांडण आपलं
रोज चालावं
असं च रोज आपण नव्याने एकमेकांनच्या प्रेमात पडावं
आपल्या ह्या प्रेमाचा साक्षीदार,
सुगंध चाफ्याने बनावं
