STORYMIRROR

Rucha Rucha

Tragedy Others

3  

Rucha Rucha

Tragedy Others

स्त्रीत्वाची कहाणी

स्त्रीत्वाची कहाणी

1 min
200

21 व्या शतकातील ती

प्रगतीच्या महामार्गावर आहे

आजही कपटी समाज तिला

 मागे खेचण्याचा वाटेवर आहे।।1

आजही अडकवतात तिला

रूढी परंपरांच्या जाळ्यात

शिऊ नको म्हणतात आजही

त्या चार दिवसाच्या काळात।।2

भरल्यासमाजात तिचा  

 का होतो विनयभंग

विकृत समाजाचे त्या 

उधळलेत किती रंग?।।3

घरदार सांबाळते ती

सांभाळते सारी नाती 

एवढे सारे करूनही

पाठी अन्यायाची साडेसाती।।4

अजूनही बीभत्स वासनेला

 बकरीप्रमाणे बळी पडते

रात्री अपरात्री येण्या-जाण्यास

आजही पाऊल तिचे अडते। 5


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy