STORYMIRROR

Vimal Patkari

Tragedy Others

4  

Vimal Patkari

Tragedy Others

स्त्री जन्माची करुण कहाणी

स्त्री जन्माची करुण कहाणी

1 min
196

स्री जन्माची करुण कहाणी ऐकता वाचता डोळा येई पाणी!!

अन्यायाचे चटके या जीवनी सोसता होई जीवाची लाही!!


जन्मताक्षणी कानी पडे का नैराश्यानं अन्यायाची वाणी?

कन्याच झाली म्हणूनीया सारे का नाराज होती ते मनी?

हर्ष आनंद कुणा ना होई घरी ना होती बारशाची गाणी!!


अश्ल़ील शब्दांचा भडिमार करूनी टवाळ करिती पोरींची छेडाछेडी 

रस्तोरस्ती हो त्रस्त करूनी देती वेळोवेळी धमकावणी 

अती प्रसंगा नकार देता घरात शिरुन देती पेटऊनी!!


तारुण्य उंबरठी उभी राहता खिळती काहींच्या भेदक नजरा 

आचार विचारा थारा न देता विणती नराधम वासनारुपी सापळा 

प्रतिकारी झुंज देऊनही किती पडती बलात्काराबळी!!


कन्या परक्याचं धन समजुनी पिता देतो विवाह करूनी 

देई सासरी तीज पाठवुनी तू सुखी रहा गं म्हणुनी 

नीत सासरच्या जाचा उबगुनी किती घेती हो आत्महत्या करुनी !!


लक्ष्मीची लालसा मनी धरुनी, माणुसकीला तिलांजली देऊनी

घरी आलेल्या हो लक्ष्मीला जीव नको नकोसा करूनी

कपट कारस्थानी दुष्कृत्यान किती होती रोज हुंडाबळी!!


कुण्या स्रीला मुलीच होती साऱ्या, कुणा मुलबाळ ना होई

वंशाला दिवा नाही म्हणूनी सासरी करिती तिची हेटाळणी 

पती ही वर्मी घाव का घाली दोष तिचाच सारा म्हणुनी?


मातेच्या उदरी वाढ होता का करिती अंकुर तपासणी?

मुलगी नको नको म्हणुनी का भृणहत्या हो करिती?

जन्माआधीच का अन्यायानं स्री जन्माची सांगता करिती? 


शिक्षणानं उच्चपद गाठुनी, स्री जन्माचा अभिमान बाळगुनी

नराधमांना सुळी चढऊनी, सासरी हो मानवता शिकऊनी 

घोर अन्याया वाचा ही फोडू स्री शक्ती सारी एकवटुनी!!


अन्यायी निशा घालवण्याला न्यायी उषा नित उदयाला आणू 

अन्यायी तिमीर जाळण्याला मशाल क्रांतीची हाती घेऊ

अत्याचारा समूळ नष्ट करण्या न्यायी सूर्य नित तळपत ठेवू!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy