STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational Others

सरते वर्ष

सरते वर्ष

2 mins
531

आजचीच रात्र माझी, माझ उद्या हीच नसणार.

आज पर्यंत होतो मि जिथे, उद्या तेथे कोणी दुसर असणार.

घडले चांगले कि वाईट, याची वजा बेरीज कोण करणार. 

वेळ कशीही असो, नाही राहणार, ती तर निघुनच जाणार.


मानन्यात आहे सुख, समाधान.... तक्रार करणारे, रडतच राहणार. 

ह्या वेळेशी आपला आहे संबध, हे नाते आहे अतूट, अतुटच रहणार. 

खंत कशाची, कृतज्ञता कशाची, हि उनीधुनी येथे कोण काढणार. 

जातोय मी जरी येथून आता तरी, सर्व काही मी , उघड्या डोळ्यांनी पहाणार.


जो आज आहे तोच खरा हि रित इथली, येथे कायम राहणार.

पण,जुन्या आठवणींचा पडेल का विसर, हि, हुरहूर कायमच जिवाला राहणार.

मग्न असाल कदाचित उद्या तुम्ही, नव्या वर्षात, नवनविन स्वप्न पहाणार.

गुण दोष काढण्यात नका गमवु हि वेळ, नवे वर्ष हे सर्व काही नवेच आणणार.


मोह, माया, स्वार्थ, मान अपमान हा आहे भ्रम फक्त, कोण कोणाला येथे काय देणार.

नका लावु मनाला कहीच,हा सर्व वेळेचा खेळ, आणि, वेळ, वेळ येथे येणार आणि जाणार.

येतो म्हणायची हि नाही सोय, मि पुन्हा कधीच नाही येणार.

पण, सोबत आठवणींच्या रूपात, कायम तुमच्या जवळच राहणार.


मि, जातानाही असाच नाही जाणार, नाही जाणार. नव्या वर्षाच्या ह्या शुभेच्छा मी तुम्हाला देणार.

काळ येईल काळ जाईल, वेळ सारखीच कायम राहणार.

आशा आहे नव्या वर्षात ह्या तुम्ही, प्रगतीच करणार, पुढेच जाणार.

होवो सर्व काही शुभ तुमच्या आयुष्यात, यशस्वी पथावर, कायम विजयी पताकाच फडकणार.


मी जात असलो जरी आता तुम्हाला, नव वर्षाच्या शुभ शुभेच्छाच देणार.

आशा करतो, आरोग्य, संपदा, धन, धान्य, ऐश्वर्या, किर्ती आयुष्यात तुमच्या येणार.

मी , जात असलो तरी आज तुम्हाला, नव वर्षाच्या ह्या हार्दिक शुभेच्छाच देणार.

नव वर्षाच्या ह्या हार्दिक शुभेच्छाच देणार.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational