STORYMIRROR

Monali Kirane

Classics

4  

Monali Kirane

Classics

सरले बालपण

सरले बालपण

1 min
293

फिरेल का मागे पुन्हा,पुढे पळणारा काळ

दुडूदुडू धावणारं होता येईल का बाळ?


काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत,खाऊ वरणभात,

बागुलबुवाच्या भितीने शिरू गोधडीच्या आत


लिमलेटच्या गोळ्यांसाठी रडून करू हट्ट,

जत्रेच्या गर्दीत धरू बाबांचा हात घट्ट


भातुकलीचा खेळ मांडू घराच्या कोप-यात,

सारे जग विसरून जाऊ काचापाणी-ठिक-यात


मोठेपण घेऊन आले आयुष्याचे ताण,

हरवले बालपण देऊन आठवणींचे वाण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics