सप्तरंग वळीवाचे
सप्तरंग वळीवाचे
धुंद पावसाच्या सरी
अंग ओलेचिंब करी
बावरले मन माझे,
उडतय वाऱ्यावरी
फुले मनात प्रेमाचे
सप्तरंग वळीवाचे
वाहे गंध मातीतुन,
सुख पडती नभाचे
झाले रान प्रफुल्लीत
आले ढंग अकस्मीत
प्राण झाले थंडगार,
थेंब झेली रानप्रीत
हर्ष मनाशी मावना
मोती पाहुन अंगना
बळीराजा सुखावला,
नम्र झाला तो गगना
दरी डोंगर भिजले
ओले मन पानांतले
इंद्रधनुष्याचे रंग
सजीवात पसरले
फुले मातीची ढेकळे
नाचे प्रेमाने सगळे
काळ्या रया साऱ्या,
उडे हरीण पिवळे
उपकार तुझा देवा
कोणी, कसा हा फेडावा?
दिला निसर्ग रुपाने
तुच अनमोल ठेवा...

