स्पंदने
स्पंदने
स्पंदने माझ्या ह्दयाची
अचानक कशी रे वाढली
तुझ्या नावाने साजना
खोडी कोणीतरी काढली (1)
काढता तुझे नाव
ह्दयात स्पंदने जोरात भांडली
तुझ्या नावाची अक्षरे साजना
माझ्या नावावर सांडली (2)
जीव गुंतला कसा तुझ्याच
तुझ्या नावाचा जप सारा
तुझ्या नावाचा जप करते
नाही जीवनात दुजा थारा (3)
अतुट बंधन हे रेशमाचे
जुळुन आल्या ऋणानुबंधाच्या गाठी
तु मला तुझ्या प्रेमात पाहिले
माझे ही जीवन तुझ्याचसाठी

