STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy Others

3  

Meenakshi Kilawat

Tragedy Others

सोसल्या मी झळा

सोसल्या मी झळा

1 min
220

सोसल्या मी झळा पाहिले जगात बहाणे  

गाली सजून हासू अन या ह्रदयात उखाणे


ओठावरी तयांच्या नावे नवी नव्याने

अस्तित्व आज माझे झाले जुने पुराणे


मी पाहिले आश्चर्य त्यांच्या डोळ्यात आता

माझ्या तरक्कीला हिनवून गेले घराणे


त्यांच्या करिता अगणित साहिले मी

दैन्य जाणूनी मी केले रिते खजाने


हे प्रश्न जीवघेणे त्यात उडवणे

नाही म्हणावयाला फसवे किती बहाणे


एकटे आले अन जगून घेतले कर्तव्य पाठी 

जगण्यात माझ्या आज आली तराणे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy