सोनं सोनं सोनं...
सोनं सोनं सोनं...
महागाईने येथे घातला राडा,
गोरगरिबांच्या स्वप्नांचा केला चुराडा.
चांदी झाली बघा लखपती,
सोनेही झाले प्रजापती.
दुसऱ्याच पहायचं मनात झुरायचं,
थेंबा थेंबान तळ कधी भरायचं.
दूधाची भूक ताकावर भागवायची,
सोन्याची किंमत वाढतच रहायची.
सोन्याच्या दुकानातून बेंटेक्स घ्यायचं,
अन चारचौघात घालून मिरवायचं.
