संत कान्होपात्रा
संत कान्होपात्रा
सोलापूर जिल्ह्यातील
वास्तव्य मंगळवेढा गाव
संत कवियत्री महान
कान्होपात्रा असे नाव||
चिखलात कमळ मुले मनोहर
अशी सुरेख कन्या रूपवान
नर्तिकेच्या पोटी जन्माला आली
गोड गळा अप्रतिम लावण्यवान||
लहानपणी विठुच्या भक्तीत
आईचा व्यवसाय नसे विचार
लाभेल ज्ञानेश्वरांचा सहवास
असे वारकरी संप्रदायाचा आचार ||
बिदरचा बादशहाची मागणी
विठ्ठल कृपेने कान्हा बचावली
विठ्ठलाच्या चरणी ठेवुनी डोके
इहलोकाची यात्रा संपविली ||