STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

संस्कार

संस्कार

1 min
218

शिकवण संस्कारांची

महत्त्वाची मुलांसाठी

नीट त्यांनी जोपासुनी

संस्कारी होण्यासाठी.


बाळपणी बाळकडू

तसे देणे संस्कारांचे

येती प्रत्यय तयांचे

मोठेपणी वागण्याचे.


मान, आदर सत्कार

वाडवडिलांना देणे

साफ स्वच्छता राखणे

पाठ पूजन करणे.


कामे स्वतःची करणे

वस्तू नीट हाताळणे

सर्व एकत्र मिळून

खाणे, जेवणे, राहणे.


शिके अनुकरणाने

शिकवावे ते संस्कार

असे होत नाही तर

कुटुंबाचे प्रतिकार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational