STORYMIRROR

Anupama TawarRokade

Fantasy Others

2  

Anupama TawarRokade

Fantasy Others

संस्कार

संस्कार

1 min
67

संस्कारांचे बीज 

अंकुरते सदा

मायेच्या मातीत

जन्मते शतदा


कोवळी सोनेरी

पाने ही होतात

संस्कारीत नित

रे सभोवतात


फुटे छोटी फांदी

घेत उंच झेप

विसर ना पडे

तिस तेव्हा क्षेप


फुले पाने फळे

बहरती वृक्षे

सदोदित येई

कामी येत साक्षे


सावली दुजास

फळे चाखण्यास

सुंगध मिळत

असे इतरास


वृक्ष उभा डौल

मान त्याची ताठ

मेळ संस्कारांचा

निसर्गाचा साठ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy