संसार
संसार


(अष्टाक्षरी)
सर्व संसार संसार,
एक सारखा चालला।
भांडं भांड्याला लागला,
असं संसार चालला॥
कधी तिखट खारट,
कमी जास्त होते मीठ।
कधी उपाशी तुपाशी,
वेळी संपते हो पीठ॥
रोज रुसवा फुगवा,
कोपऱ्यात बसायचं।
हेच चालत असते,
नाव संसार याचेच॥
होते पाहीले मी स्वप्न,
फुललेल्या गुलाबाचे।
हाती लागत राहिले,
ओरखडे हे काट्यांचे॥
सुख दुःखाची सावली,
यात खुलतो संसार।
आयुष्याच्या प्रकाशात,
कधी येतो हा अंधार॥