STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

संसार (गझल)

संसार (गझल)

1 min
174

तुझ्या प्रेमात आलो मी तिथे सोडून गावाला

तुझ्यासाठी घरी आलो किती भांडून भावाला

घरेदारे तुझ्या नावे तुझ्या नावेच शेतीही

नसे काहीच संपत्ती सखी माझ्याच नावाला

तिथे वृद्धाश्रमी सोडून आलो माय बाबाला

कसा गेला बळी माझा तुझ्या राणी दबावाला

नसे शांती मनी माझ्या सुखानेही दिला धोका 

कुणा सांगू कसे सांगू मनाच्या या तणावाला

नसे स्वातंत्र्य मनालाही जगायाचे सखे आता

कसे मी तोंडही देऊ तुझ्या मोठ्या उठावाला

अटी शर्थी जिथे लागू खरे ते प्रेम नाही ना

कळेना अर्थ प्रेमाचा तुझ्या हट्टी स्वभावाला

अरे युद्धात अन प्रेमात सारे माफ आहे ना

इथे हारून जातो मी तुझ्या राणी बनावाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy